मालेगावी महापौर-आयुक्तांकडून ईदगाह मैदानांची पाहणी
By Admin | Updated: June 20, 2017 00:35 IST2017-06-20T00:35:01+5:302017-06-20T00:35:24+5:30
मालेगावी महापौर-आयुक्तांकडूनईदगाह मैदानांची पाहणी

मालेगावी महापौर-आयुक्तांकडून ईदगाह मैदानांची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : आगामी रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सात ईदगाह मैदानांची महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. पावसामुळे मैदानांवर चिखल होऊ नये म्हणून बारीक वाळू टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
येत्या २६ जून रोजी रमजान ईद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधव विविध ईदगाह मैदानांवर नमाज व दुवा पठण करीत असतात. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. ठेकेदाराकडून वाळू टाकली जात आहे. मंगळवारी महापौर शेख, आयुक्त धायगुडे, शहर अभियंता कैलास बच्छाव व काँग्रेसच्या नगरसेवकांनी पोलीस कवायत मैदान, दरेगाव मैदान, तजवील कुराण इदगाह, मुफ्ती आझम इदगाह, कालीकुट्टी इदगाह, खलील हायस्कूल इदगाह, मिल्लत मदरसा आदि मैदानांची पाहणी केली.