मालेगावी पिवळ्या शिधापत्रिकेची मागणी
By Admin | Updated: July 11, 2014 00:49 IST2014-07-10T23:14:53+5:302014-07-11T00:49:56+5:30
मालेगावी पिवळ्या शिधापत्रिकेची मागणी

मालेगावी पिवळ्या शिधापत्रिकेची मागणी
मालेगाव : येथील मोतीबाग नाका परिसरातील रहिवाशांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात याव्या, अशी मागणी रिपाइं युवा शहराध्यक्ष जागन ढिलोर यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या भागातील नागरिक अशिक्षित असून, त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे त्यांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात याव्या. तसेच बीपीएल शिधापत्रिकाधारकांना पूर्वीसारखेच २० किलो गहू व १५ किलो तांदूळ व रॉकेल देण्यात यावे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.