मतोबा महाराज यात्रेनिमित्त माळेगावला कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:30 IST2020-01-12T00:21:26+5:302020-01-12T01:30:03+5:30

दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथे मतोबा महाराज यात्रोत्सवनिमित्ताने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

Malegaon Wrestling Riot for Matoba Maharaj Yatra | मतोबा महाराज यात्रेनिमित्त माळेगावला कुस्त्यांची दंगल

मतोबा महाराज यात्रेनिमित्त माळेगावला कुस्त्यांची दंगल

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथे मतोबा महाराज यात्रोत्सवनिमित्ताने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
शाकंबरी पौर्णिमा यात्रेनिमित्त खासदार भारती पवार यांनी मतोबा महाराज यांचे दर्शन घेतले. गावात मतोबा महाराजांच्या रथाची मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. रात्री मतोबा महाराजांच्या मंदिराजवळ लोककला सादर करण्यात आली. यावेळी दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, पुणेगाव, हस्ते, पिंपरी, कोल्हेर, चौसाळे, सारसाळे, अभोणा, नांदुरी, कळवण, येवला, सावरगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, देवळा तालुक्यातील भाविक व पैलवान दंगलीसाठी उपस्थित होते .

Web Title: Malegaon Wrestling Riot for Matoba Maharaj Yatra