शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मालेगाव : वीज वितरण कंपनीऐवजी खासगी कंपन्यांकडून निविदा वीजपुरवठा यंत्रणा खासगीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:39 AM

मालेगाव कॅम्प : वीज वितरण कंपनीचा मालेगाव विभाग धन दांडग्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन खासगीकरणाचा घाट रचला जात आहे. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली.

ठळक मुद्देनिविदा भरण्याची मुदत निकषांमध्ये बसत असल्याचा दावा

मालेगाव कॅम्प : वीज वितरण कंपनीचा मालेगाव विभाग धन दांडग्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन खासगीकरणाचा घाट रचला जात आहे. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली असून, २० फेब्रुवारीपर्यंत संबंधित कंपन्यांना निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या घडामोडींमुळे वीज कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणतर्फे ठाणे जिल्ह्यातील शिळ, मुंब्रा, कळवा उपविभाग, अकोला ग्रामीण तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराची वीज खासगीकरण करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. शासनाच्या विद्युत अधिनियमन कायदा २००३ अन्वये ज्या शहरात, विभागात ५० टक्क्यापेक्षा अधिक वीज गळती, चोरी व महसुलमध्ये घट आदि निकषानुसार त्या शहर विभागात वीज कंपनी खाजगी संस्थेला देण्याचा नियम केला आहे. त्यानुसार एका सर्वेक्षणानुसार मालेगावसह वरील शहरे त्या निकषांमध्ये बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार अनेक वर्षांपासून खासगीकरणाचा घाट सुरू झाला आहे.यासाठी सर्व वीज कर्मचारी, अधिकारी, विविध विभागावर संघटनांनी विरोध केला आहे.वेळोवेळी निषेध, आंदोलन, मोर्चादेखील काढले आहेत. या समस्या सोडविण्यासाठी ११ सप्टेंबर २०१७ रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धुळे व मालेगाव हे खासगीकरण न करण्याबाबत पत्रदेखील पाठविले आहे़ तरी याबाबत शासनाने दखल घेतली नाही. या निर्णयामुळे येथील वीज कंपनीच्या सुमारे ७७५ कर्मचाºयांच्या रोजगारासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील वीजचोरी, गळतीस वीज कंपनी जबाबदार असल्याचे येथील कर्मचाºयांनी सांगितले. कारण अनेक वर्षांपासूनच्या जीर्णतारा, नादुरुस्त रोहित्रे व तक्रारी निपटारा करणारी सक्षम यंत्रणा कंपनीकडे नसल्याने येथील शहर खासगीकरणाच्या निषकांमध्ये गणले गेले आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.खासगीकरणामुळे वीज कर्मचारी व वीज ग्राहक यामध्ये भरडले जाणार आहे. नवीन कंपन्यांचे नियम अटी सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. मालेगाव शहर हे कामगारांचे, यंत्रमाग, मुस्लीमबहुल वस्ती व संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. खासगीकरण झाल्यास शासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.मालेगाव उपविभाग वर्गवारीप्रमाणे ग्राहकमालेगाव : शहर क्र. १, २, व ३ ग्रामीण उपविभाग, मालेगाव उपविभागसह दाभाडी येथे घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, उच्चदाब ग्राहक, पाणीपुरवठा, पथदीप, यंत्रमागधारक इतर असे एकूण १८१,६०० इतके ग्राहक आहेत. वीजपुरवठा करणारे ४८३५ रोहित्रे, मासिक उत्पन्न २८ कोटी रुपये आहे. विभागात एकंदरीत अधिकारी व कर्मचारी यांची ६५० पदे मंजूर आहेत. मालेगाव शहरासह तालुक्यात एकूण १५० गावांचा मालेगाव विभागात समावेश आहे. विभागात एकूण सहा उपविभाग कार्यरत आहेत.