माळेगावची पाहणी
By Admin | Updated: January 8, 2017 00:51 IST2017-01-08T00:51:17+5:302017-01-08T00:51:28+5:30
स्मार्ट ग्राम : समितीकडून समाधान

माळेगावची पाहणी
सिन्नर : माळेगाव ग्रामपंचायतीने शासनाच्या स्मार्ट ग्राम व्हिलेज स्पर्धेत सहभाग घेतला आहे. माळेगाव ग्रामपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी समितीने भेट घेऊन तपासणी केली.
शासनाने स्मार्ट ग्राम व्हिलेज स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने माळेगाव येथे पाहणी केली. माळेगाव ग्रामंपचायतीने राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेत समितीने समाधान व्यक्त केले.
सरपंच अनिल आव्हाड व ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. समितीमध्ये नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सहायक लेखाधिकारी श्रीमती शेजवळ, विस्तार अधिकारी शिंदे, सानप, बिन्नर, कांगणे यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी उपसरपंच वामन गाडे, सदस्य अशोक जाधव, अमोलिक जाधव, मंगेश सांगळे, कचरू जाधव, खंडू सांगळे, रंजना सांगळे, मालती आव्हाड, शैला पवार, सुशीला सांगळे, अहेर, अनुसया बोडके, मनीषा सांगळे, स्मिता पगारे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)