मालेगावी स्थायी समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:14 IST2020-08-24T22:35:21+5:302020-08-25T01:14:28+5:30
मालेगाव : जलवाहिनी व पथदीप देखभाल दुरुस्ती व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या निविदांना सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मालेगावी स्थायी समितीची बैठक
ठळक मुद्देजलवाहिनी व पथदीप देखभाल दुरुस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : जलवाहिनी व पथदीप देखभाल दुरुस्ती व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या निविदांना सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्थायी समिती सभापती खालीद परवेझ यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात स्थायी समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रभाग क्र. १ मधील जलवाहिनींच्या लिकेज, व्हॉल्व्ह दुरुस्ती इतर कामांच्या दुरुस्तीची निविदा तसेच हॉटमिक्स पद्धतीने रस्ता दुरुस्ती, पथदीपांची देखभाल दुरुस्ती यासह एकूण पाच विषयांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. बैठकीला मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे, स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.