शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

आनंदाच्या शिधासोबत देणार मालेगावची साडी - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:27 IST

मालेगावी यंत्रमागधारकांची बैठक.

चंद्रकांत सोनार, मालेगाव (नाशिक) : शहरातील यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आगामी काळात मालेगावच्या यंत्रमागावर तयार होणाऱ्या साड्या शासनाकडून खरेदी करून आनंदाचा शिधासोबत दारिद्र्यरेषेखालील महिलांना देण्याचा मानस आहे. त्याद्वारे मालेगावच्या वस्त्रोद्योगाला चालना मिळून नागरिकांच्या हक्काचा रोजगार मिळू शकेल, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

येथील डायमंड हॉलमध्ये शहरातील यंत्रमागधारकांची बैठक घेण्यात आली. त्यात यंत्रमागधारकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, सुमित पवार, काकाजी पवार आदींसह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात शेती व कापड निर्मिती या व्यवसायातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी अशा ठिकाणी यंत्रमागधारकांची संख्या अधिक आहे. देशातील पारंपरिक उद्योगाला आगामी काळात चालना मिळावी, यासाठी वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल सरकारतर्फे माफक दरात व्यावसायिकांना पुरविला जाणार आहे. त्यातून निर्माण होणारे कापड सरकारकडून खरेदी केले जाणार आहे. यासाठी यंत्रमागासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याबाबतही शासन विचाराधिन असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावे

ओबीसीला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. यासाठी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना आश्वासन दिले आहे. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परंतु तरीही जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरही उपाेषणाची गरज काय, असा सवालही शेवटी त्यांनी केला. नितेश राणेंना देणार सल्लामालेगाव शहराला वारंवार मिनी पाकिस्तान संबाेधल्याने धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. यावर मंत्री पाटील म्हणाले की, आमदार नितेश राणे यांनी मालेगावचा मिनी पाकिस्तान केलेल्या वक्तव्याशी पक्षाचा काही एक संबंध नाही. मात्र, राणे यांनी असे बोलू नये, असा सल्ला पक्षाकडून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक