मालेगावी वाळू उपसा सुरूच
By Admin | Updated: December 1, 2015 22:47 IST2015-12-01T22:46:09+5:302015-12-01T22:47:18+5:30
मालेगावी वाळू उपसा सुरूच

मालेगावी वाळू उपसा सुरूच
मालेगाव : येथील नदीपात्रातून वाळू उपसा सुरूच असून, रात्रीच्या वेळी शहरभर चोरीची वाळू टाकण्यात येते.
येथील दोन्ही नदीपात्रातील वाळू ठिय्यांचा लिलाव झालेला नाही. त्यात शासनाने वाळूसह सर्व प्रकारच्या गौणखनिज उपशावर बंदी आणलेली असताना तत्कालीन अधिकाऱ्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह अनेक ग्रामपंचायतींनी वाळू उपशास विरोध केला होता. मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने नदीपात्रातील वाळू चोरीस गेली होती. त्यामुळे चारचार वेळा वाळूच्या निविदा काढूनही एकही निविदा दाखल करण्यात आली नव्हती. या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी नवीन अधिकारी दाखल झाले. यामुळे वाळू उपसा थांबेल, अशी आशा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र ही आशा फोल ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत असून, नदीपात्रातून दिवसभर वाळू उपसा करण्यात येत आहे. यासाठी ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)