मालेगाव मनपाला मिळेना ‘एमबीबीएस’ डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:17 IST2020-08-19T21:50:56+5:302020-08-20T00:17:51+5:30
मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे दिसून येते.

मालेगाव मनपाला मिळेना ‘एमबीबीएस’ डॉक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे दिसून येते.
तीन वेळा मनपातर्फे कोविडसाठी आरोग्य विभागात पदभरतीसाठी जाहिराती देण्यात आल्या. आता १४ आॅगस्ट रोजी ४२७ जागांसाठी मालेगाव महानगरपालिकेने जाहिरात दिली; मात्र त्यात एम.डी. डॉक्टर्सच्या १४ आणि एमबीबीएस डॉक्टर्सची ७६ पद भरण्यासाठी तिसऱ्यांदा जाहिरात देण्यात येऊन एकही एमबीबीएस डॉक्टर मालेगाव महापालिकेला मिळत नसल्याची तक्रार आहे.
महापालिकेतर्फे एमबीबीएस डॉक्टरला ‘कोविड’ काळात ६० हजार मानधन देण्यात येणार आहे. मात्र कुणीही या पदासाठी अर्ज करीत नसल्याचे विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे यांनी सांगितले.
या भागात कुणी एमबीबीएस झालेले पदवीधर मिळत नाहीत, बाहेरच्या जिल्ह्यातून कुणी डॉक्टर यायला तयार नाही. त्यामुळे आता महापालिकेला ‘एमबीबीएस’ डॉक्टर कधी मिळतो याकडे शहराचे लक्ष लागून आहे.