मालेगाव : पती व सावत्र मुलांच्या जाचास कंटाळून विवाहितेने ॲसिड प्राशन करून आत्महत्या केली. रुबिना सोहराब अली (४०), असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रुबिना पती व तिघा सावत्र मुलांसह जाफरनगर भागात राहत होती. पती सोहराब मोहम्मद शरीफ हा मुले अहेमद, सिराज व सोहेल यांच्या मदतीने छळ करत होता. तिला वेडसर ठरवून लथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर हाकलून देत होते. दोन वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक छळ असाह्य झाल्याने रुबिनाने स्वच्छतागृहातील ॲसिड पिऊन आत्महत्या केली. मोहम्मद युसूफ मोहम्मद हारुण यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जी.एस. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मालेगावी विवाहितेची ॲसिड पिऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST