मालेगाव मनपाने वसुलीसाठी दोन गाळ्यांना लावले सील
By Admin | Updated: November 24, 2015 21:52 IST2015-11-24T21:52:25+5:302015-11-24T21:52:57+5:30
मालेगाव मनपाने वसुलीसाठी दोन गाळ्यांना लावले सील

मालेगाव मनपाने वसुलीसाठी दोन गाळ्यांना लावले सील
मालेगाव : येथील महानगरपालिकेने थकीत कर वसुलीधारकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पथकाने आज चार ठिकाणी कारवाई करत दोन गाळ्यांना सील लावले, तर दोन थकबाकीदारांकडून सुमारे पावणेदोन लाखाची वसुली केली आहे.
येथील मनपाची शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे विविध करांची थकबाकी आहे. त्यात मनपा आर्थिक संकटात सापडलेली असल्याने आयुक्तांच्या आदेशाने थकबाकीदार व्यावसायिकांविरोधात उपआयुक्त कमरुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त शमसुद्दीन शेख, कर अधीक्षक शकील सय्यद, लिपिक रमाकांत धामणे, किरण पगारे, जयवंत पाटील व दिलीप मोरे यांच्या पथकाने शहरात चार ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत दोन गाळेधारकांकडून एक लाख ७० हजार ८३६ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली, तर कुसुंबा रस्ता व सोमवार बाजार येथे प्रत्येकी एक गाळ्याला सील लावण्यात आले. यात कुसुंबा रस्त्यावरील सर्व्हे नंबर ४४ मधील क्रमांक ६ नंबरचा गाळा व कॅम्प भागातील सोमवार बाजार येथील १ नंबरचा गाळा यांचा समावेश आहे. यातील कुसुंबा रस्त्यावरील गाळामालक शेख अनु शेख युसुफ यांच्याकडे ७३ हजार २२८ रुपये, तर सोमवार बाजारातील म. स. ग्राहक संघाचे व्यवस्थापक यांच्याकडे १ लाख २० हजार ३८६ रुपये करांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)