मालेगावी कोविड योद्धा चषक पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:34+5:302021-01-25T04:15:34+5:30
गेल्या १६ जानेवारी रोजी फ्रंट लाईन कोविड योद्धा चषक नावाने बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या ...

मालेगावी कोविड योद्धा चषक पारितोषिक वितरण
गेल्या १६ जानेवारी रोजी फ्रंट लाईन कोविड योद्धा चषक नावाने बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण ५४ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यात दोन महिला कर्मचारी यांचेही संघ होते. सहभागी प्रत्येक संघांना सहभागासाठी स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर विजेता उपविजेता व तृतीय विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले, तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट खेळाडू या पारितोषिकांचेही वितरण झाले.
एकदिवसीय दिवस-रात्र स्पर्धेत शेवटच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात उपायुक्त विकास यांच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, तर गतवर्षाच्या वाडिया दवाखाना आरोग्य कर्मचारी संघाने उपविजेतेपद मिळविले. नगर रचना विभागाने तृतीय पारितोषिक पटकाविले.