मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 29, 2014 00:54 IST2014-07-29T00:29:28+5:302014-07-29T00:54:43+5:30

मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Malegaon Jain Social Group felicitates meritorious students | मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मालेगाव जैन सोशल ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन सोशल ग्रुपतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अग्रसेन भवन येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील विक्रीकर अधिकारी सुमेर काले उपस्थित होते.
सुमेर काले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले. जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्वत्र जैन समाजाचा विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल जैन सोशल ग्रुपतर्फे यंदाच्या वर्षी शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात ग्रुपचे अध्यक्ष दीपक शहा, सचिव बिपीन पहाडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. जैन सोशल ग्रुपच्या महिला अध्यक्ष पंकज वडेरा यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुवर्णा काले, संजय शहा, वर्धमान नानावटी, नेमीचंद मोदी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात सोशल ग्रुपचे सुगनचंद बडजाते, विनोद पहाडे, मनोज सेठी, विशाल पतंगीया, नीलिमा शहा, प्राची जैनसह सकल जैन समाजाचे अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रक्षा पटणी, सचिन शहा यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Malegaon Jain Social Group felicitates meritorious students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.