मालेगावी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:42 IST2020-03-01T23:41:27+5:302020-03-01T23:42:51+5:30
मालेगाव : शहरातील श्रीरामनगर भागात राहणाऱ्या सचिन संजय पगारे (२२) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मालेगावी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देसचिन पगारे यास मद्यसेवनाचे व्यसन होते.
मालेगाव : शहरातील श्रीरामनगर भागात राहणाऱ्या सचिन संजय पगारे (२२) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण कळू शकले नाही. सचिन पगारे यास मद्यसेवनाचे व्यसन होते. मद्याच्या नशेत तो मित्राकडे गेला; परंतु मित्राच्या घराला कुलूप असल्याने तो परत आला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. नितीन निंबा झाल्टे रा. आंबेडकरनगर ग. नं. ४ यांनी कॅम्प पोलिसात खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.