मालेगावी गावठी कट्टा जप्त
By Admin | Updated: February 10, 2017 00:15 IST2017-02-10T00:15:01+5:302017-02-10T00:15:13+5:30
स्थानिक गुन्हे शाखा : दोघांसह एका अल्पवयीन मुलास अटक

मालेगावी गावठी कट्टा जप्त
मालेगाव : शहरातील सराईत गुन्हेगाराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच दुकानफोडी प्रकरणी अन्य दोघा जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून ३७ भ्रमणध्वनी व गॅसकटर असा ५९ हजार ४७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गिरणा चौपाटी येथे बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगत असलेला मोहंमद शहाबाज ऊर्फ कमांडो मोहंमद युसुफ (रा. गोल्डननगर) याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचा देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त केली. कमांडोला पोलिसांनी खाक्या दाखविला असता त्याने भ्रमणध्वनीचे दुकान फोडले असल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्याचा साथीदार मोहंमद कलामउद्दीन ऊर्फ आरीफ मोहंमद कलामउद्दीन (रा. रजापुरा) व एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्यांनी जुना आग्रारोडवरील मोबाइल दुकान फोडून दुकानातील ३७ भ्रमणध्वनी संच चोरल्याची कबुली दिली आहे. गॅसकटरच्या साह्याने दुकानाचे कुलूप तोडण्यात आले होते.
या प्रकरणी पुढील तपास
छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्वकर्मा करीत आहेत. (प्रतिनिधी)