इंधन दरवाढ विरोधात मालेगावी सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:48+5:302021-07-09T04:10:48+5:30
केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर ...

इंधन दरवाढ विरोधात मालेगावी सायकल फेरी
केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेल ९२ रुपये लीटर झाले आहे. घरगुती गॅसची किंमत ९०० रुपये झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र शासनाच्या महागाई व दरवाढीच्या निषेधार्थ शहर काॅंग्रेसने माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीला किदवाई रोडवरील शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयापासून सुरुवात झाली. सायकल फेरी किदवाई रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मोसम पूल, कॅम्प रोड, एकात्मता चौक मार्गे नवीन तहसील कार्यालयावर निघाली. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तहसीलदार राजपूत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काॅंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
फोटो फाईल नेम : ०८ एमजेयुएल ०१. जेपीजी
फाेटो कॅप्शन :
केंद्र शासनाने इंधन दरवाढ व महागाई कमी करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना देताना माजी आमदार रशीद शेख. समवेत काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
फोटो फाईल नेम : ०८ एमजेयुएल ०२. जेपीजी
फाेटो कॅप्शन : मालेगावी इंधन, गॅस व महागाई विरोधात काॅंग्रेसने काढलेली सायकल फेरी.
080721\08nsk_39_08072021_13.jpg~080721\08nsk_40_08072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.