शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या गुन्हेगाराकडून चार दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:27 IST

महिला दुचाकीस्वाराला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहे.

ठळक मुद्दे७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

नाशिक : शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. ठक्कर बाजार येथून महिला दुचाकीस्वाराला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठक्कर बाजार बसस्थानकाच्या वाहनतळातून आॅगस्ट महिन्यात फिर्यादी प्रतीक्षा प्रवीणकुमार संचेती (२९, रा.प्रमोद महाजन उद्यानाजवळ) यांची अ‍ॅक्टिवा मोपेड दुचाकी (एमएच १५ डीक्यू ०८८७) नजर चुकवून मदतीच्या बहाण्याने लंपास केली होती. याप्रकरणी संचेती यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा दुचाकीचोर येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गुणवंत गायकवाड यांनी आपल्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढत मिळालेल्या माहितीनुसार हवालदार मुकेश राजपुत, सुरेश शेळके , प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, दिलीप गुंजाळ आदींच्या पथकाने सापळा रचून मालेगाव तालुक्यातील देवगट येथून संशयित चोरटा सागर केवल पाटील (३०) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने संचेती यांच्या अ‍ॅक्टिवासह होंडा डिलक्स (एमएच १५ सीएच ४६९६), स्पेलेंडर प्लस (एमएच १५ सीवाय ५३४२) आणि गुजरातमधून चोरी केलेली पॅशन प्रो (जीजे ०१ एसक्यू ७८८०) अशा ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक