मालेगावी नगरसेवकाचा बायोडिझेलसदृश्य द्रव्याचा अड्डा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 10:14 PM2021-09-28T22:14:37+5:302021-09-28T22:16:40+5:30

मालेगाव:- मुंबई आग्रा महामार्गा लगत पवारवाडी शिवारात भावना रोडलाईन्स नावाच्या निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये व जे के मोटर्स च्या पाठीमागील एका पत्राच्या गुदामावर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून १७ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीचे बायोडिझेल सदृश्य विस्फोटक द्रव्यांचा साठा जप्त केला आहे

Malegaon corporator's biodiesel-like substance den demolished | मालेगावी नगरसेवकाचा बायोडिझेलसदृश्य द्रव्याचा अड्डा उध्वस्त

मालेगावी नगरसेवकाचा बायोडिझेलसदृश्य द्रव्याचा अड्डा उध्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्देचौघा जणांविरुद्ध गुन्हा,दोघेही मूळ मालक फरार :४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव:- मुंबई आग्रा महामार्गा लगत पवारवाडी शिवारात भावना रोडलाईन्स नावाच्या निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये व जे के मोटर्स च्या पाठीमागील एका पत्राच्या गुदामावर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून १७ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीचे बायोडिझेल सदृश्य विस्फोटक द्रव्यांचा साठा जप्त केला आहे
पथकाने या कारवाईत टँकर व इतर साधने असा ४३ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या अड्ड्याचे मूळ मालक नगरसेवक एजाज बेग अजीज बेग असल्याचे समोर आले आहे.
मालेगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडिझेल सदृश्य द्रव्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस महा निरीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती त्यानुसार मंगळवारी स्टार हॉटेल शेजारी भावना रोडलाईन्स नावाच्या निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने धाड टाकली यावेळी शेख अनिस शेख रशीद (३६) रा गुलशेरनगर हा आढळून आला तर मूळ मालक नगरसेवक एजाज बेग फरार झाला आहे .तसेच जे के मोटर पाठीमागील एका पत्र्याच्या गोदामात जविद खान अहमद खान रा चमननगर हा आढळुन आला तर मूळ मालक जुबेर खान नासीर खान हा फरार झाला आहे

पोलिसांनी दोघा गुदामातील व टँकर मधील बायोडिझेल सदृश्य द्रव्य १७ लाख लाख ८६ हजार ४०० रुपये किंमतीचे २३ हजार २०० लिटर जप्त केले आहे पोलिसांनी डिझेल द्रव्याचा साठा ,टँकर व इतर साधने असा एकूण ४३ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Malegaon corporator's biodiesel-like substance den demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.