मालेगाव : महागठबंधनच्या २७ नगरसेवकांना पक्षादेश विरोधक सरसावले आयुक्तांच्या मदतीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:18 IST2018-01-12T23:58:56+5:302018-01-13T00:18:48+5:30
आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेचे महापौर- आयुक्तांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनपातील विरोधक आयुक्तांच्या बाजुने सरसावले आहेत. येत्या महासभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या ...

मालेगाव : महागठबंधनच्या २७ नगरसेवकांना पक्षादेश विरोधक सरसावले आयुक्तांच्या मदतीस
आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेचे महापौर- आयुक्तांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनपातील विरोधक आयुक्तांच्या बाजुने सरसावले आहेत. येत्या महासभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या किंवा ‘त्या’ आदेशाच्या विरोधात एखादा प्रस्ताव आणण्यात येऊ शकतो असे गृहित धरुन महागठबंधन आघाडीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी महाआघाडीच्या २७ नगरसेवकांना पक्ष आदेशच बजावला आहे. त्यामुळे महापौर-आयुक्त यांच्यातील वादात विरोधी पक्षाने अप्रत्यक्षपणे उडी घेतल्याने वाद मिटण्यऐवजी अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
गेल्या बुधवारी सकाळी अंदाज पत्रकात निर्धारीत करण्यात आलेल्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी महापौर रशीद शेख यांच्या दालनात गटनेते, नगरसेवक व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत आयुक्तांकडून विकास कामांबाबत अटीशर्ती लावण्यात आल्यावरुन महापौर रशीद शेख व आयुक्त संगिता धायगुडे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती. त्यातच गुरूवारी सायंकाळी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत शहर हितासाठी आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचे जाहीर केल्याने महापौरांसह सत्ताधाºयांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे येत्या मासिक सभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या कार्यपद्धती किंवा ‘त्या’ आदेशाच्या विरोधात एखादा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी जनता दलाकडून विकासकामांचे तुकडे पाडण्यात येऊ नये, गुणवत्तापूर्वक कामे व्हावीत यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे विरोधकांसाठी चालुन आलेल्या संधीचे सोनं करुन घेण्याची वेळ न दडवता महागठबंधन आघाडीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी महागठबंधनच्या २७ नगरसेवकांना अशा प्रकारे प्रस्ताव आल्यास त्याचे समर्थन न करण्यासाठी पक्ष आदेश बजावला आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात विरोधकांनी अप्रत्यक्षपणे उडी घेतल्याने या वादात अधिक भर पडली असून वाद चिघळणार आहे.