शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:14 PM

मालेगाव : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.

ठळक मुद्देदिलासादायक : केवळ ६८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह; १८५ पैकी ५३ प्रतिबंधित क्षेत्र, प्रशासनाची एकजूट

अतुल शेवाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मेहनत, उपाययोजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आता केवळ ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) कमालीचीघट झाली आहे. सध्या केवळ ५३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहेत. कोविडचा उद्रेक झाल्यानंतर मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते.१शहरवासीयांनी कोरोनाशी प्रदीर्घ काळ लढा दिला. सद्य:स्थितीत केवळ ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर येथील मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची अहोरात्र मेहनत व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मालेगाव शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. प्रारंभी झपाट्याने झालेली रुग्णवाढ सध्या कमी झाली आहे. नागरिक व प्रशासनाने एकजूट दाखवल्यामुळे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव सध्या पूर्वपदावर आले आहे. २प्रशासनाने कोरोबाबतचे अज्ञान, गैरसमज दूर करून प्रशासनाप्रति विश्वास निर्माण केला. परिणामी मालेगाव पॅटर्न उदयास आला आहे. प्रशासनाने दोनशे खाटांचे नॉनकोविड व बाराशे खाटांचे कोविड रुग्णालय तयार केले होते. कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी पद्धतीचे उपचार करण्यात आले. अनुभवी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले. शासनाने पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करून दिला. बाहेरगावचे तज्ज्ञ डॉक्टर बोलाविण्यात आले होते. खासगी डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेतली. ३शहराच्या पूर्व भागातील शंभर डॉक्टरांनी मोहल्ला क्लिनिक संकल्पना राबवून रुग्णांवर उपचार केले व कोरोनाची भीती पळवून लावली. पोलीस, महसूल, मनपा प्रशासनाने कर्तव्य चोख बजावले तसेच विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. परिणामी राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असताना अगदी दाटीवाटीचे, गजबजलेले व झोपडपट्टीचे शहर म्हणून ओळख असलेले मालेगाव शहर सध्या कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे, ही बाब जिल्ह्यासह शहरवासीयांसाठी दिलासादायक आहे. गेल्या ८ एप्रिल रोजी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले होते. यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत गेली. शहरात तब्बल १ हजार २२५ बाधित रुग्ण आढळून आले होते, यापैकी १०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ८४ जणांचा मृत्यू झाला. शहरात तब्बल १८५ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. जनजीवन विस्कळीत होऊन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalegaonमालेगांव