प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाथरे यांनी केले. महिला क्रांती मंचच्या उपाध्यक्ष वंदना आहिरे यांच्या हस्ते भुजरिया करण्यात आले. डॉ.अनिता राजबंशी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी तरुण मुलींना आयुष्यात संकट आले तर संघर्ष करावा, असे आवाहन केले. प्रा. बबिता कासवे यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सचिव रवींद्र अहिरे यांनी समाजातील महिलांनी आता स्वयंरोजगार निर्माण करून स्वत:ला सिद्ध करावे.असे आवाहन केले. दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरू रविदास समता सामाजिक विचारमंचचे सल्लागार राजेश काथेपुरी,संतोष कासवे, भारत सुरंजे, उपाध्यक्ष देविदास सुरंजे, कोषाध्यक्ष नंदू डावरे, अमोल तेली, दिपक आसान,चेतन तेली,अबोली तेली उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहित तेली यांनी तरआभार किरण राजवंशी यांनी मानले.