मालेगाव कॅम्पात अतिक्रमण हटाव मोहीम

By Admin | Updated: February 4, 2016 22:43 IST2016-02-04T22:41:12+5:302016-02-04T22:43:18+5:30

नागरिकांची गर्दी : हनुमान मंदिर, दत्त मंदिर, मोसमपूल चौक, गवळीवाडा परिसरात तणाव

Malegaon camp elimination encroachment campaign | मालेगाव कॅम्पात अतिक्रमण हटाव मोहीम

मालेगाव कॅम्पात अतिक्रमण हटाव मोहीम


मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत आज कॅम्प परिसरातील असंख्य अतिक्रमणे मनपा कर्मचाऱ्यांनी काढली. यामुळे परिसरात नागरिकांची व अतिक्रमणधारकांची एकच गर्दी उसळली होती.
आजपासून प्रभाग १ मधील रावळगाव नाका, भायगाव रोड, जुने कॅम्प पोलीस ठाणे, मोची कॉर्नर, कॅम्प रस्ता, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, मल्लूशेठ बंगला ते गणेश कुंडापर्यंत, मोसमपूल चौक, गवळीवाडा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेस रावळगावनाका येथे प्रारंभ झाला. यापूर्वी अतिक्रमणधारकांना लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही नागरिकांनी अगोदरच हे अतिक्रमण काढून घेतली होती.
या मोहिमेत आज अनेकांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढले तर काही मनपा कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्त केले. आज दिवसभरात रावळगावनाका, भायगाव रस्त्यावरील ५०हून अधिक लहानमोठ्या रस्त्यास अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढले. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु मोहीम कारवाईचा फार्स ठरू नये, असे सांगितले.
मोहिमेत प्रभाग १चे अधिकारी पंकज सोनवणे, नगररचनाकार शकील सय्यद, अतिक्रमण अधीक्षक दीपक हातगे, इमारत पर्यवेक्षक डी. एम. कुलकर्णी, विविध प्रभागातील बीट मुकादम दिलीप निकम, संजय वालखेडे, हर्षल गढरी, संजय जगताप, अजय चांगरे यांनी सहभाग घेतला.
ही अतिक्रमण मोहीम बेकायदेशीर आहे. कॅम्प रस्त्यावरील व इतर ठिकाणचे अतिक्रमण-धारकांची संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत सनदशीर मार्गाने चर्चा सुरू आहे व काही अटी, नियमांसह हे अतिक्रमण कायदेशीर करण्याचे आश्वासन दिल्यानंतरदेखील ही कारवाई सुरू केल्याने या परिसरातील अतिक्रमण काढण्यास आम्ही विरोध करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Malegaon camp elimination encroachment campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.