मालेगावी लाचखोर उप व्यवस्थापकास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:33 IST2021-05-22T01:32:19+5:302021-05-22T01:33:35+5:30
गृहकर्जापोटी १० हजाराची लाच स्वीकारतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव मुख्य शाखेच्या उप व्यवस्थापकास मुंबई सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मालाई कांचन असे लाचखोराचे नाव आहे. त्यास निलंबीत करण्यात आले आहे.

मालेगावी लाचखोर उप व्यवस्थापकास रंगेहाथ पकडले
मालेगाव : गृहकर्जापोटी १० हजाराची लाच स्वीकारतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव मुख्य शाखेच्या उप व्यवस्थापकास मुंबई सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मालाई कांचन असे लाचखोराचे नाव आहे. त्यास निलंबीत करण्यात आले आहे.
मालाई कांचन (३१)रा.रामेश्वर नगर, नाशिक हा उप व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे गृहकर्ज सल्लागार असुन त्यांना कमिशन दिले जाते. तक्रारदाराने कमिशनचे देयके सादर केली असता कांचन याने त्यांच्याकडे ८० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पथकाने सत्यता पडताळत तक्रारदाराकडुन दहा हजारांची लाच स्वीकारतांना कांचन यास पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.