मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

By Admin | Updated: September 10, 2016 01:38 IST2016-09-10T01:29:36+5:302016-09-10T01:38:38+5:30

मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

Malegaon blasts MPs meet | मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

मालेगाव मनपा सभापतींना मारहाण

मालेगाव : महासभेत स्थायी समिती सभापतींना माजी महापौरांकडून हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
महापालिका महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हाजी मो. इब्राहीम होेते. प्रभारी आयुक्त दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेत अंदाजपत्रकाच्या इतिवृत्त मंजुरी व महापौरांनी सुचविलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करावा या विषयावरून महापौर हाजी मो. इब्राहीम व उपमहापौर युनुस ईसा यांच्यात वाद झाला. स्थायी समिती सभापती एजाज बेग महापौरांची बाजू घेत उपमहापौरांवर टीकाटिप्पणी करीत असल्याने माजी महापौर एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मलिक यांनी सभागृहात एजाज बेग यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांचा भाऊ माजीद मलिक यानेही सभागृहात प्रवेश करीत बेग यांना मारहाण केली. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. स्वामी यांनी प्रभाग दोनसह इतर तीनही प्रभागाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी स्वतंत्र बैठक घेऊन समस्या व अडचणी जाणून घेण्यात येतील. (प्रतिनिधी)

Web Title: Malegaon blasts MPs meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.