मालेगावी १८ बांगलादेशी नागरिकांना अटक
By Admin | Updated: May 22, 2014 22:20 IST2014-05-22T22:20:23+5:302014-05-22T22:20:23+5:30
सायने बुद्रुक शिवारात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणार्या १८ बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण विभागाच्या पथकाने छापा टाकून अटक केली.

मालेगावी १८ बांगलादेशी नागरिकांना अटक
बेकायदेशीर वास्तव्य : सायने बुद्रुक शिवारात कारवाई
मालेगाव : सायने बुद्रुक शिवारात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणार्या १८ बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण विभागाच्या पथकाने छापा टाकून अटक केली. या कारवाईत बांगलादेशी सीम कार्ड व मोबाइलसह नऊ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व बांगलादेशींना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना येत्या रविवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सायने बुद्रुक शिवारात केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (आयएचएसडीपी) योजनेंतर्गत म्हाडातर्फे गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी भारतात अवैधरीत्या प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट व्हीसा नसताना अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक ग्रामीण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मंगळवारी मध्यरात्री १२.४५ वाजता वरील ठिकाणी छापा टाकला. संशयितांकडून पोलिसांनी बांगलादेशी सीम कार्ड व मोबाइल असा ९हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस हवालदार नितीन रामनाथ मंडलिक यांच्या फिर्यादीवरुन वरीलतालुका पोलीस ठाण्यात पासपोर्ट (एन्ट्री इन इंडिया) १९२0 चा नियम ३ (अ) तसेच दि पासपोर्ट (एन्ट्री इन इंडिया) १९५0 चे नियमांचे उल्लंघन ६ (अ) व विदेशी नागरिक अधिनियम १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांना न्यायालयाने २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत. (वार्ताहर)