मालेगावी दहावीत विद्यार्थिनींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:27+5:302021-07-19T04:11:27+5:30

एसपीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के मालेगाव : येथील एस.पी.एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के ...

Malegaon 10th class students won | मालेगावी दहावीत विद्यार्थिनींनी मारली बाजी

मालेगावी दहावीत विद्यार्थिनींनी मारली बाजी

एसपीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

मालेगाव : येथील एस.पी.एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. त्यात राकेश बळिराम जाधव याने ८५.४ टक्के गुण मिळवून प्रथम, प्रियंका कैलास वाघ ८३.६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर भूमिका रामदास धाबधले ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या कल्पना देसले, पर्यवेक्षक एन. एम. सोनवणे, प्राध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०३. जेपीजी - प्रथम - राकेश जाधव

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०२. जेपीजी - द्वितीय - प्रियंका वाघ

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०१. जेपीजी - तृतीय - भूमिका धाबधले

जामेअतुल हुदा हायस्कूल मालेगाव

मालेगाव : येथील जामेअतुल हुदा हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात मोहंमद आमिर मो. रफीक याने ८२ टक्के गुण मिळवून प्रथम, जैद मोहंमद मोहंमद शाबान याने ८०.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर शेख वाजिद शेख अजीज याने ७८.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०७. जेपीजी - प्रथम - मोहंमद आमीर

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०८. जेपीजी - द्वितीय - जैद मोहंमद

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०९. जेपीजी - तृतीय - शेख वाजिद

चिखलओहोळ दहावी निकालात मुलींनीच मारली बाजी

सोयगाव : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, राज्यातही यंदा ही मुलींनीच बाजी मारली आहे.

कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. ऑनलाईनसाठी सगळ्यांकडे मोबाईल उपलब्ध झाला नाही. कधी नेटवर्क समस्या, कधी रिचार्ज नाही, अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी बजावली.

तालुक्यातील चिखलओहोळ येथील कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, पहिल्या ४ मध्ये येण्याचा बहुमान मुलींनाच मिळाला आहे. विद्यालयात जान्हवी सतीश शिंदे या विद्यार्थिनीने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम, तर पलक महेशराव देशमुख ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, सुनयना रवींद्र देशमुख ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. शुभांगी युवराज म्हस्के ८७.४० चतुर्थ, तर रोशन गोकुळ पाचोरे ८६.८० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांना चेअरमन संदीप देशमुख, मुख्याध्यापक देसार, पर्यवेक्षक दापूरकर व शिक्षक, शिक्षकेतर यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल २२. जेपीजी - प्रथम - जान्हवी शिंदे

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०४. जेपीजी - द्वितीय - पलक देशमुख

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल ०६. जेपीजी - तृतीय - सुनयना देशमुख

लिटील एंजल्स्‌ स्कूलचे दहावीच्या निकालात यश

मालेगाव : येथील लिटील एंजल्स्‌ इंग्लिश मिडीअम स्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. स्कूलमध्ये नंदिनी आनंद बंग ९७.८० टक्के प्रथम, इशिता आशिष झंवर ९७.४० टक्के मिळवून द्वितीय, तर भूमी मुकेशकुमार संकलेचा ९७.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल १९. जेपीजी - प्रथम - नंदिनी बंग

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल २०. जेपीजी - द्वितीय - इशिता झंवर

फोटो फाईल नेम : १८ एमजेयुएल २१. जेपीजी - तृतीय - भूमी संकलेचा

Web Title: Malegaon 10th class students won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.