मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

By Admin | Updated: September 29, 2016 01:31 IST2016-09-29T01:31:06+5:302016-09-29T01:31:27+5:30

मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

Malegae dog shoots, stolen brats selling medicines | मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

मालेगावी कुत्ता गोळी, औषधे विकणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

मालेगाव : वैद्यकीय सल्ला व पावतीशिवाय सेवन करण्यास मनाई असलेल्या अल्प्रालोझम (मालेगावच्या भाषेत कुत्ता गोळी) व कोडीन फॉस्फेट औषध व गोळ्या जवळ बाळगून त्या नशेसाठी विक्री करणाऱ्या दोन वर्षासाठी शहरातून तडीपार असलेल्या नसीम अख्तर मो. सलीम ऊर्फ नसीम मोट्या, रा. हकीमनगर याला आझादनगर पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याजवळून बारा हजार ९०४ रूपये किमतीचे औषधे व गोळ्या जप्त केल्या आहेत.
आझादनगर पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बुधवारी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. मालेगाव शहरात नशेसाठी औषधे व गोळ्यांचा वापर केला जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांना मिळाली होती. त्यानुसार आझादनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जे. टकले, पोलीस हवालदार प्रकाश बनकर, सुनील पाटील, अमोल पाटील, लक्ष्मण वाघ यांनी नसीम मोट्या याच्या हकीमनगर भागातील घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडे अल्प्रालोझम या चार हजार ९०४ रूपये किंमतीच्या दोन हजार १७० गोळ्या व कोडीन फॉस्फेट नावाचे आठ हजार रूपये किंमतीच्या ७७ बाटल्या आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अश्विन ठाकरे, चंद्रकांत मोरे यांनी गोळ्या व औषधांची तपासणी केली आहे. औषध निरीक्षक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलीस ठाण्यात नसीम मोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तडीपार असताना शहरात वास्तव्य केल्याप्रकरणीही पोलीसांकडून वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malegae dog shoots, stolen brats selling medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.