मालेगावी दोन दिवसात १० मिमी पाऊस
By Admin | Updated: October 13, 2015 22:39 IST2015-10-13T22:37:52+5:302015-10-13T22:39:01+5:30
मालेगावी दोन दिवसात १० मिमी पाऊस

मालेगावी दोन दिवसात १० मिमी पाऊस
मालेगाव : शहर व तालुक्यातील काही भागात गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत असून यात शहरात १० मीमी पावसाची नोेंद झाली आहे.
शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नव्हता. त्यामुळे रब्बीच्या आशा धुसर होत असताना सोमवारी रात्री पाऊस झाला आहे. यात सोमवारी कॅम्प भागात अर्धा ते पाऊनतास पाऊस तर तालुक्यातील करंजगव्हाण (१ मी.मी), सायने (०३मीमी), सौदाणे (०६मीमी) वगळता इतर गावात पाण्याचा थेंबही पडला नाही. मंगळवारी रात्री शहरात ०२ मीमी, दाभाडीत ०१ मीमी, सौंदाणेत ०१ मीमी, सायनेत ११ मीमी व वडनेरमध्ये १.२ मीमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात १८ व १९ सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने पुन्हा तालुक्याकडे पाठ फिरविली होती.
यंदाच्या पावसाळ््यात अद्याप मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून सलग पाच ते सात दिवस दमदार पाऊस झाल्यास पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आक्टोंबर महिना सुरु असला तरी थंडीचा मागमुसही जाणवत नाही. याउलट तापामानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वत्र उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत.