मालेगावी तालुकास्तरीय फुटबॉल-कुस्तीस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:37 IST2018-08-25T17:37:17+5:302018-08-25T17:37:22+5:30

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

Malegaavi Taluka level Football-Kushi competition | मालेगावी तालुकास्तरीय फुटबॉल-कुस्तीस्पर्धा

मालेगावी तालुकास्तरीय फुटबॉल-कुस्तीस्पर्धा

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत वजीरखेडे येथील जनता विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
या खेळाडूंची जिल्हास्तावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटात आकाश शेलार, आकाश पाटील, सिद्धार्थ बोरसे, भावेश बोरसे, जयेश शेलार, राम शेलार, कृष्णा शेलार, तन्मय रायकर, मयुर जाधव, पराग बोरसे, तिरुपती जाधव, रोशन ओसवाल, रितेश काकड तर १७ वर्ष वयोगटात हेमंत बोरसे, अभिषेक शेलार, शुभम बोरसे, प्रसाद रायकर, संकेत ओसवाल, कल्पेश शेलार, सोमनाथ चव्हाण, राहूल बागुल, शंतनु बोरसे, अर्जुन अल्हाट, रितेश लोंढे, श्रीकांत पाटील, किरण अहिरे आदिंचा समावेश आहे.
तर येथील क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत जनता विद्यालयाच्या कुस्तीपटुंनी यश मिळविले आहे. मुलांच्या १४ वर्ष गटात अमोल पवार, १७ वर्ष गटात रितेश लोंढे, अर्जुन अल्हाट तर मुलींच्या १७ वर्ष गटात मनिषा खलसे, लक्ष्मी लोंढे या कुस्तीपटुंची जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक भारत काकड, मुख्याध्यापक बी. ए. डांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Malegaavi Taluka level Football-Kushi competition