मालेगावी तालुका कॉँगे्रसचा मोर्चा
By Admin | Updated: October 6, 2015 22:04 IST2015-10-06T21:58:02+5:302015-10-06T22:04:10+5:30
मालेगावी तहसिलदार यांना निवेदन देताना तुषार शेवाळे. समवेत प्रसाद हिरे, शांताराम लाठर, राजेंद्र ठाकरे, सुकदेव देवरे आदि.

मालेगावी तालुका कॉँगे्रसचा मोर्चा
मालेगाव : येथील तालुका कॉँगे्रसने प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.
यावेळी मोर्चेकऱ्यांंनी शेतकऱ्यांना कर्ज व वीजबिल माफी, तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, डिझेल, पेट्रोल दरवाढ रद्द करा, गिरणा उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडावे, विद्यार्थ्यांना फी माफी द्यावी, गुरांसाठी चारा तगाई मिळावी आदि मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार किशोर बच्छाव यांना दिले.मोर्चात तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, महिलाध्यक्ष संगीता बच्छाव, तालुका कार्यवाहक
सुकदेव देवरे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, सतीश पगार, रामकृष्ण पवार, प्रसाद हिरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)