ंमालेगाव : येथील अग्रसेन भवनात कंचनसेवा संस्थान उदमपूर यांच्यातर्फे प्राकृतिक चिकित्सा सेवा शिबिर घेण्यात आले. उद्घाटन आमदार दादा भुसे यांच्या हस्ते झाले. मोहनलाल सराफ यांचा सत्कार आमदार भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, तर प्रेमराज जाखोटिया, श्यामसुंदर लाखोटिया, मोहनलाल सराफ, छैलबिहारी शर्मा, माधवराव जोशी, प्रा. सुनेत्रा मेश्रामकर, मीनाक्षी भावसार, वल्लभ जाखोटिया यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. छैलबिहारी शर्मा यांचे भाषण झाले. मीनाक्षी भावसार यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी विजय खरे, पोपट जाखोटिया, मधुकर केदारे, श्रीमती जयश्री पाटील आदि नागरिक उपस्थित होते.
मालेगावी प्राकृतिक चिकित्सा सेवा शिबिर
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST