कन्नूर हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावी मोर्चा

By Admin | Updated: March 2, 2017 00:36 IST2017-03-02T00:35:53+5:302017-03-02T00:36:07+5:30

मालेगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांवर प्राणघातक हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता

Malegaavi Morcha protested against Kannur attack | कन्नूर हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावी मोर्चा

कन्नूर हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावी मोर्चा

मालेगाव : केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांवर व भाजपा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.
केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक व भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. काजीकोडा गावातील सेवक व कार्यकर्त्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. येथील मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संघाचे प्रदीप बच्छाव, नगरसेवक व भाजपाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, बन्सीलाल कांकरिया आदिंची भाषणे झाली. यानंतर अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना कारवाई करण्याच्या मागणीचे व निषेधाचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, तालुकाध्यक्ष श्रीकांत शेवाळे, संघाचे सतीश कजवाडकर, सुनील चव्हाण, जयेश थोरात, सुरेश निकम, उमाकांत कदम, बापू चित्ते, दीपक गायकवाड, विवेक वारुळे आदिंसह संघ व भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Malegaavi Morcha protested against Kannur attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.