मालेगावी मोहरम शांततेत
By Admin | Updated: October 24, 2015 22:33 IST2015-10-24T22:32:58+5:302015-10-24T22:33:35+5:30
मालेगावी मोहरम शांततेत

मालेगावी मोहरम शांततेत
मालेगाव : शहर व परिसरात शनिवारी मोहरम सण पारंपरिक पध्दतीने शांततेत साजरा करण्यात आला.
मुस्लीम बांधवांच्या नव वर्षाच्या सुरुवातीला मोहरम सण साजरा करण्याची प्रथा आहे. करबला येथील लढाईत हौतात्म्य पत्करलेल्या इमाम हसन इमाम हुसेन यांच्या हौतात्म्यानिमित्त मोहरम सण श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. यावेळी ताजियांची स्थापना करण्यात येते.
शहरात शनिवारी मोहरमच्या पार्श्वभूमीवर दोन आलम पंजाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यात शिया समुदायाची मुख्य व मानाची मिरवणूक येथील चंदनपुरी गेट भागातील शिया मशिदीतून काढण्यात आली होती. यावेळी डोल्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया समुदायाच्या या मिेरवणुकीत ४०० ते ५०० भाविक सहभागी झाले होते. सदर मिरवणुकीचे शिया कब्रस्थान येथे विसर्जन करण्यात आले. दुसरी आलम पंजाची मिरवणूक पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत काढण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर परिसरात १६, तर तालुक्यातील झोडगे येथे २ सवाऱ्यांची अशा एकूण १८ तर पाच शेरबाग यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
यात आझादनगर पोलीस ठाणे हद्दीत ३ सवाऱ्या, छावणी हद्दीत एक सवारी, कॅम्प हद्दीत ५ सवाऱ्या, आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत ३ सवाऱ्या, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत ४ सवाऱ्यांचा तसेच पवारवाडी हद्दीतील ५ शेरबाग यांचा समावेश आहे. येथील पोलीस ठाणे हद्दीत एक आखाड्याचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, शहरात शंभरपेक्षा जास्त ताजियांची स्थापना करण्यात आली असून, विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे.