मालेगावी एमआयएमकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:12 IST2019-02-17T01:11:59+5:302019-02-17T01:12:32+5:30
मालेगाव मध्य : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भुईकोट किल्ला येथे निषेध केला. या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मालेगावी एमआयएमकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध
मालेगाव मध्य : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भुईकोट किल्ला येथे निषेध केला. या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ म्हणाले की, जवानांवर झालेला हल्ला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. हल्लेखोर आदिल अहमद ऊर्फ वक्कास याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. यात तो स्वत:ला स्वर्गवासी होणार असल्याचे म्हणून घेत आहे; परंतु मुस्लीम तरुणांनी यावर विश्वास ठेवू नये. ज्या धर्माने निष्पाप नागरिकांचे रक्त सांडण्यास मनाई केली आहे. त्यात जीव घेणे तर फार लांब आहे. त्यामुळे तरुणांनी इस्लाम धर्माच्या शिकवण व सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानावर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉ. परवेज यांनी केले आहे.