मालेगावी एकता मंडळातर्फे महेश्वर मंदिराची प्रतिकृती

By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-01T22:10:34+5:302014-09-02T01:13:44+5:30

मालेगावी एकता मंडळातर्फे महेश्वर मंदिराची प्रतिकृती

Malegaavi Ekta Mandal's replica of Maheshwar Temple | मालेगावी एकता मंडळातर्फे महेश्वर मंदिराची प्रतिकृती

मालेगावी एकता मंडळातर्फे महेश्वर मंदिराची प्रतिकृती

  मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मानाचा गणपती समजला जाणारा एकता मंडळातर्फे यंदाच्या वर्षीसुद्धा गणेशोत्सव दहा दिवस धार्मिक देखावा गणेश भक्तांसाठी खुला ठेवणार आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर मंदिराची भव्य मोठी प्रतिकृती देखाव्यानिमित्त तयार करण्यात आली. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार असलेल्या सटाणा नाका भागातील एकता मंडळाची यंदा सत्तावीस वर्षांकडे वाटचाल सुरू आहे. प्रत्येकवर्षी मंडळातर्फे गणेशोत्सवमध्ये वेगवेगळे प्रकारचे धार्मिक व समाजउपयोगी देखावे केले जातात. यंदाच्या वर्षी महेश्वर मंदिर (गुप्तकाशी)चे विलोभनीय मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिर थर्माकोल, प्लायवूड आदि वस्तुंनी तयार केले आहे. यासाठी कलकत्ता, इंदोर येथील चाळीसहून अधिक कारागीर गेल्या महिन्यापासून परिश्रम घेत आहे, तर उत्सव काळात विद्युत रोषणाई, ५१ हजार लाडूंचा महाप्रसाद, ताहाराबाद, जळगाव, धुळे येथील नृत्यांचे पथक, परिसर अधिक उजळण्यासाठी या भागातील इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Malegaavi Ekta Mandal's replica of Maheshwar Temple