शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हिवताप मृत्यूचे प्रमाण शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:53 IST

जागतिक  हिवताप दिन नाशिक : हिवताप अर्थात मलेरिया रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून गेल्या पाच ...

जागतिक  हिवताप दिननाशिक : हिवताप अर्थात मलेरिया रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात मलेरिया मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे. तत्पूर्वीही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. असे असले तरी या आजाराचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता असल्यामुळे जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वपूर्ण ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला असता हिवताप आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत शून्य झाली आहे.हिवताप हा आजार अ‍ॅनाफिलिस डासांची मादी चावल्यामुळे होत असतो. रक्त तपासणीनंतर आजाराची लागण झाली आहे अथवा नाही हे निष्पन्न होते. वरवर हा अत्यंत साधा आजार वाटत असला आणि मृत्यूची शक्यता शून्यावर आली असली तरी वेळीच या आजारावर उपचार झाले नाही तर जिवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. सन २०१६ पासून जिल्ह्यात हिवतापामुळे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले असले तरी यापूर्वी म्हणजे सन २०११ ते २०१५ या कालावधीत आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या ११ इतकी होती.मागीलवर्षी ७ लाख ९८ हजार १५१ इतके रक्तनमुने घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये ९ रक्ताचे नमुने हे दूषित आढळून आले होते. या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आल्यामुळे त्यांच्या जिवावरील धोका टळला.मात्र रक्ताचे नमुने उद्रेक श्रेणीत गेल्यास अशा रुग्णांच्या जिवाला धोका वाढू शकतो.त्यामुळे आजाराचा उद्रेक होण्यापूर्वीची काळजी हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कार्यक्रम दरवर्षी १५ एप्रिल रोजी घेतला जातो.आरोग्याची लक्षणेहिवताप हा आजार अ‍ॅनाफिलीस डासांची मादी चावल्यामुळे होत असतो. या डासांची उत्पत्ती गावाच्या सभोवताली साचलेले पाण्याच्या साठे, नदी, नाले, तलाव आदी ठिकाणी होते. या डासांचे जीवनचक्र ८ ते १० दिवसांचे असते. या काळात डासांची मादी पाण्यामध्ये अंडे, अळी, कोप, डास या अवस्थांची निर्मिती करीत असते. नंतर प्रौढ डास तयार होतात. हिवताप आजारामध्ये तीव्र ताप, थंडी, घाम येणे, डोकेदुखी, मळमळ अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. प्लासमोडियम फॅल्सीफेरममध्ये क्वचित प्रसंगी हिवतापामुळे मृत्यू संभवतो.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक