मखमलाबाद नाका बनला अपघाताचे केंद्र
By Admin | Updated: September 15, 2015 22:23 IST2015-09-15T22:22:50+5:302015-09-15T22:23:42+5:30
शिवसेनेचा आरोप : दुभाजकांची उंची वाढविण्याची मागणी

मखमलाबाद नाका बनला अपघाताचे केंद्र
नाशिक : मखमलाबाद नाका ते पेठफाटा हा धोकादायक बनला असून, वाहतुकीच्या गर्दीमुळे आणि पालिकेच्या सदोष नियोजनामुळे येथे अपघात होत आहेत, अशी तक्रार शिवसेनेच्या पंचवटी विभागाने केली आहे. यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन दिले असून, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली आहे.
सदरचा रस्ता अपघाताचे केंद्र बनला आहे. या मार्गावर दररोजच अपघात होत असून, अनेकांचे बळीही गेले आहेत. तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. या रस्त्याची नव्याने बांधणी करताना दुभाजकाची उंची अतिशय कमी ठेवल्याने अनेक अपघात घडतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या भागात त्वरित दुभाजकांची उंची वाढवावी आणि काही भागांत गतिरोधक टाकावेत, अशी मागणी अभय दिघे, संतोष आखाडे, राकेश साळुंके, अभिजित सोनवणे, राजाभाऊ थोरात, भगवान कालेकर, मिलिंद पवार, शंकर झोले, नीलेश सोनवणे, इम्रान शेख, सुनील गोऱ्हे यांनी केली.