शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कुसुमाग्रज उद्यानाचा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:12 AM

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत येणारे गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आता कात टाकत असून, त्याचा ‘मेकओव्हर’ लवकरच दृष्टीपथास येणार आहे.

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत येणारे गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आता कात टाकत असून, त्याचा ‘मेकओव्हर’ लवकरच दृष्टीपथास येणार आहे. सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण व सुशोभिकरणाची कामे सुरू असून, त्यामुळे दरवर्षी मराठी भाषादिनी नजरेस पडणारे उद्यानाचे ओंगळवाणे स्वरूप यंदा पाहायला मिळणार नाही. सन २००१ मध्ये माजी उपमहापौर गुरुमित बग्गा हे स्वीकृत सदस्य असताना त्यांच्या संकल्पनेतून गोदाकाठावरील जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत कुसुमाग्रजांच्या काव्यशिल्पांच्या माध्यमातून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, सुरुवातीचा वर्षभराचा काळ सोडला तर त्यानंतर उद्यानाला अवकळा प्राप्त होत गेली. कुसुमाग्रज उद्यानातील काव्यशिल्पांची तुटफूट झाली. साफसफाईअभावी पालापाचोळा साचत गेला. तेथील पूल, अ‍ॅम्पी थिएटरची दुरवस्था झाली, फरशा उखडल्या आणि आडवळणात असलेले हे उद्यान प्रेमीयुगुलांचे तसेच जुगाºयांचाही अड्डा बनले. याशिवाय, गोदावरी नदीला येणाºया महापुरामुळे उद्यानात बरीच पडझड होऊन दुरवस्था झाली. गेल्या १५ वर्षांत केवळ तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यापलीकडे उद्यानाची कामे होत नव्हती. दरम्यान, मागील पंचवार्षिक काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदर उद्यानाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उद्यानाचा ‘मेकओव्हर’ करण्याचे काम हाती घेण्याचे आदेश महापालिकेतील आपल्या पदाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक यांनी जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या महासभेत उद्यानाच्या नूतनीकरणासाठी २ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. त्यानुसार आराखडा तयार करून मक्तेदारामार्फत सध्या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यशिल्पांना आकर्षक रूपात बघायला मिळणार असून, पर्यटकांसाठी स्वतंत्र ट्रॅकही आकर्षण ठरणार आहे. नव्या आराखड्यानुसार ५९६० चौरस फूट जागेवर नव्याने प्रशस्त उद्यान साकारले जाणार आहे. दोन अ‍ॅम्पी थिएटरची उभारणी करण्यात आली असून, रॅम्पही तयार करण्यात आले आहेत. याशिवाय स्वच्छतागृहाची उभारणी झालेली आहे. प्रवेशद्वाराचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. नदीकाठावरील भाग हा सहा फूट उंच उचलून त्याचे सपाटीकरण होत आहे. उद्यानात संवादकट्टा साकारण्यात येत असून, त्याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. कॅफे एरियासाठीही स्वतंत्र जागेचा प्रस्ताव आहे. एप्रिल महिन्याअखेर काम पूर्णत्वाला नेण्याचा मानस महापालिकेच्या सूत्रांनी बोलून दाखविला.स्मार्ट सिटी अंतर्गत पुलांची निर्मितीस्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीपात्रावर दोन पुलांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यातील एका पुलामुळे गंगापूररोडवरून कुसुमाग्रज उद्यानात प्रवेश करणे सहज सोपे जाणार आहे. शिवाय गोदाकाठावरच असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय आणि दुसºया तटावरील कुसुमाग्रज उद्यान यांची कनेक्टिव्हीटी या पुलामुळे होऊन पर्यटनाला चांगला वाव मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका