पूरक पोषण आहार योजनेची सखोल चौकशी व्हावी
By Admin | Updated: July 15, 2014 00:47 IST2014-07-14T22:57:42+5:302014-07-15T00:47:35+5:30
पूरक पोषण आहार योजनेची सखोल चौकशी व्हावी

पूरक पोषण आहार योजनेची सखोल चौकशी व्हावी
नाशिक : न्यायडोंगरी (नांदगाव) येथे पूरक पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना या पूरक पोषण आहार योजनेवर झालेले आरोप पाहता त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
१४ जुलै रोजीच्या ‘लोकमत’च्या अंकात न्यायडोंगरी येथील पूरक पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत सुनीता अहेर यांनी सांगितले की, शासनाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहार दिला जातो. मात्र वितरण व्यवस्थेमध्ये सदोषपणा असल्याचे न्यायडोंगरीच्या बाबतीत म्हणता येईल. त्यामुळे या योजनेची तत्काळ सखोल चौकशी करून जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी,असे सुखदेव बनकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
बोकटे येथील दुचाकीस्वार ठार
येवला : येथील एक दुचाकीस्वार घसरून झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. विश्वास माधवराव दाभाडे (वय ४२, रा. बोकटे) हे एमएच-१५,डीसी-२१८ या दुचाकीवरून पढेगावहून अंदरसूलकडे येत असताना सुदाम सोनवणे यांच्या वस्तीजवळ दुचाकी घसरली. विश्वास दाभाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली व ते जागीच ठार झाले. (वार्ताहर)