उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:05 AM2019-07-14T02:05:34+5:302019-07-14T02:06:09+5:30

मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

Make proper arrangements for available water | उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

मालेगाव तालुक्यातील मोहपाडा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम आदेशाचे वाटप करताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे. समवेत पंचायत समिती सदस्य शंकर बोरसे, भगवान मालपुरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे आदी.

Next
ठळक मुद्देदादा भुसे ; मालेगावी सरपंच-उपसरपंच मेळाव्यात आवाहन

मालेगाव : तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
येथील अग्रेसन भवन येथे जिल्हा परिषद व मालेगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच मेळाव्यात राज्यमंत्री भुसे बोलत होते.
यावेळी भुसे म्हणाले की, चणकापूर, पुनंद धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया या तलावात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी गावातील पाण्याबाबतची गंभीर परिस्थिती ग्रामस्थांसमोर मांडा, अशा स्पष्ट सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.
राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून एक हजार ग्रामपंचायतींची कार्यालये बांधली जाणार आहेत. त्याअंतर्गत तालुक्यात २१ ग्रामपंचातींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे, तर नऊ ग्रामपंचायतींना मंजुरीची प्रतीक्षा आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.


मेळाव्यात सौंदाणेचे सरपंच डॉ. मिलिंद पवार यांच्यासह विविध गावांतील सरपंचांनी सूचना व समस्या मांडल्या. मेळाव्याला पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, शंकर बोरसे, सरला शेळके, कृष्णा ठाकरे, दाभाडीच्या सरपंच चारुशिला निकम, विश्वनाथ निकम, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Make proper arrangements for available water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.