शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळी करूया...

By किरण अग्रवाल | Updated: November 4, 2018 00:59 IST

दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त दिवाळी साजरी करावी लागेल.

ठळक मुद्दे दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त अगर पर्यावरणपूरक असेल याची काळजी घेणे गरजेचेयंदा फटाक्यांचा धूर न करण्याची शपथ अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करून पर्यावरणाला हातभार लावूया...

सारांशदीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण असल्याने चिंता करण्यासारखे मुद्दे कमी नसताना तो साजरा करण्याची एव्हाना सर्वांचीच तयारी झाली आहे. या चिंतेच्या विषयात वैयक्तिक व सार्वजनिक स्तराचेही अनेक मुद्दे असून, महागाई व त्यात पडलेली दुष्काळी स्थितीची भर प्रामुख्याने नोंदविता येणारी आहे. पण त्याहीखेरीज वाढते वायु व ध्वनिप्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर तसेच आरोग्यावरही होणारा प्रतिकूल परिणाम लक्षणीय असल्याने; त्याकडे दुर्लक्ष करता येणारे नाही. कारण, ही बाब प्रत्येकाशीच, म्हणजे अगदी नवजात बाळापासून ते आयुष्याची सांजकाल अनुभवणाऱ्या ज्येष्ठांपर्यंत साºयांशीच निगडित आहे. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त अगर पर्यावरणपूरक असेल याची काळजी घेतली जाणे अत्यंतिक गरजेचे ठरले आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली असल्याने बळीराजा तसा चिंतातुरच आहे. शासनाने आपल्या राजधर्माला जागत काही तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करून विविध सोयी-सवलती दिल्याने या चिंतेची तीव्रता नक्कीच कमी व्हावी; पण म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवावेत असेही नाही. त्यात महागाई कमी नाही. स्वयंपाकाच्या ‘गॅस’चाच असा काही भडका उडाला आहे की, आपले केरोसिन व मातीच्याच चुली बºया म्हणण्याची वेळ यावी. मुद्दे अनेक आहेत; पण दिवाळीच्या तोंडावर नको त्याचीच चर्चा. सभोवताली चांगलेही बरेच काही घडत असते. त्यातूनच प्रेरणेचा मार्ग प्रशस्त करायला हवा. भिंतीवरल्या काळ्या डागाकडे पाहण्यापेक्षा पांढºया कवडशाकडे बघितलेलेच अधिक बरे. दिवाळी तर प्रकाशाचाच उत्सव. अंधारलेल्या काळोखावर सकारात्मकतेचा, आशेचा दीप लावला तर अंधार दूर होण्यास नक्कीच मदत घडून येईल. हा काळोख अगर अंधार केवळ समस्या, विवंचनांचाच नाही. तो पर्यावरणाला बाधा पोहोचवून मनुष्य-प्राण्यांच्या जिवाला हानी पोहचविणाराही ठरू पाहतो आहे. म्हणूनच, ही दिवाळी साजरी करताना विशेषत: प्रदूषणमुक्तीचा प्रकाश उजळण्याची गरज आहे.पर्यावरण रक्षणाची निकड शाळकरी मुलांमध्ये अधिक परिणामकारकपणे रुजत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. गणेशोत्सवाच्या काळातही शाळा-शाळांमधील मुलांनी शाडूमातीच्या मूर्तींसाठी पुढाकार घेतल्याने गणेशोत्सव बºयापैकी पर्यावरणपूरकपणे पार पडला. मिरवणुकांतील ‘डीजे’च्या दणदणाटावर बंदी आणली गेल्यानेही ध्वनिप्रदूषणास मोठा आळा बसला. त्याप्रमाणेच यंदा फटाक्यांचा धूर न करण्याची शपथ अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मुलेच फटाक्यांसाठी आग्रही राहणार नसतील तर पालकांचा दुहेरी लाभ घडून येईल. एकतर खरेदीचा खर्च टळेल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे फटाकामुक्ततेतून पर्यावरणपूरक दिवाळीच्या मोहिमेत त्यांचा सहभाग घडून येईल. याशिवाय, दीपावलीत फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही दोन तासांची वेळ निर्धारित करून दिली आहे. आपल्यातील न्यायप्रियता कायम असल्याने या निर्णयाचा नक्कीच परिणाम अपेक्षित आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करून त्यानुसार मापनपद्धती अवलंबिली आहे. या साºयांच्या एकत्रित परिणामातून यंदाच्या दिवाळीत खºयाअर्थाने विषमुक्ततेच्या दिशेने प्रभावी पावले पडलेली दिसून यावीत.महत्त्वाचे म्हणजे, याबाबतीतली जाणीवजागृती जेवढी प्रभावी तितका त्याचा परिणाम अधिक असतो. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्र्यांनीही प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आवाहन केले आहे. सामाजिक संस्थाही त्यासाठी पुढे आलेल्या आहेत. तेव्हा हे जागरण प्रत्यक्ष नुकसानीची जाणीव करून देणारेही असेल तर ते अधिक पोहोचेल. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वायुप्रदूषणामुळे म्हणजे प्रदूषित हवेमुळे २०१६मध्ये जगात सहा लाख मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने जगातील १५ वर्षे वयाच्या आतील तब्बल ९३ टक्के मुलांना श्वसनाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत असल्याचेही यात म्हटले आहे. फटाके फोडताना त्यातून निघणाºया धुराचा व त्यातील विषारी घटकांचा गर्भातील बाळांवरही घातक परिणाम होत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. अस्थमा रुग्णांसाठी व लहान मुले तसेच ज्येष्ठांनाही फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज व त्यातून घडून येणारे प्रदूषण हानिकारकच असते. मग कशाला फोडायचे असे फटाके? तेव्हा, चला यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करून आपणच आपले आरोग्य जपण्यासाठी पर्यावरणाला हातभार लावूया... 

टॅग्स :NashikनाशिकDivaliदिवाळीSocialसामाजिकpollutionप्रदूषणfire crackerफटाके