तोतया ‘पोलीसगिरी’अशीही बनवा बनवी
By Admin | Updated: March 24, 2015 00:05 IST2015-03-24T00:04:55+5:302015-03-24T00:05:02+5:30
एकाच दिवशी शहरात दोन ठिकाणी सोन्याची लूट

तोतया ‘पोलीसगिरी’अशीही बनवा बनवी
नाशिकरोड : आनंदनगर हरिनिवास सोसायटीतील रमेश दत्तात्रय देशपांडे हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ८.३०च्या सुमारास मॉर्निंगवॉक करून बिटको महाविद्यालयामागील जलतरण तलाव येथून घरी जात होते. याचवेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा तोतयांनी देशपांडे यांना थांबवून त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगितले. यावेळी त्या दोघा चोरट्यांचा तिसरा साथीदार तेथे पायी आला. या तिघांनीही पायी जाणाऱ्यांनी आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने खिशात काढून ठेवावे, असे सांगितले. देशपांडे २४ ग्रॅम वजनाच्या ४० हजार रुपये किमतीच्या हातातील सोन्याच्या चार अंगठ्या, गळ्यातील सोन्याची साखळी काढून रुमालात बांधून ठेवत असताना त्या तिघा चोरट्यांनी नजर चुकवून त्यांचे दागिने लंपास केले.
नाशिकरोड भागात सकाळी-सकाळी दुचाकीवर आलेल्या सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीने काम फत्ते करून पलायन केले. (प्रतिनिधी)