उमेदवारांकडे पैसे मागणाऱ्यांची चौकशी करा

By Admin | Updated: December 9, 2014 00:32 IST2014-12-09T00:32:32+5:302014-12-09T00:32:54+5:30

कॉँग्रेसच्या स्वातंत्र्य सैनिक सेलच्या सदस्याची मागणी

Make inquiries for candidates seeking money from the candidates | उमेदवारांकडे पैसे मागणाऱ्यांची चौकशी करा

उमेदवारांकडे पैसे मागणाऱ्यांची चौकशी करा

  नाशिक : कॉँग्रेसची जी आज वाताहत झाली आहे, त्याला कॉँग्रेसचे नेते व पदाधिकारीच कारणीभूत असून, निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडे पैशांची मागणी करणारे अनेक नेते व पदाधिकारी आपणास दिसून आले. त्यांची तातडीने चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे माजी स्वातंत्र्य सैनिक सेल सदस्य व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बापूसाहेब मालसाने यांनी केली आहे. तसेच जिल्हाध्यक्षांनी कॉँग्रेस पक्ष विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या विरोधात कॉँग्रेसच्याच अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी काम केले. कॉँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवाला जबाबदार असणाऱ्या गद्दारांची तत्काळ हकालपट्टी करावी. आपण कॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून, पराभवास जबाबदार असणाऱ्या घरच्या भेद्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच उमेदवारांकडून पैसे मागणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे बापूसाहेब मालसाने यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Make inquiries for candidates seeking money from the candidates