आदिवासी भागासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:00+5:302021-07-17T04:13:00+5:30
मान मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याबरोबरच त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पेठ-सुरगाणा कळवण- बागलाण ...

आदिवासी भागासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय करा
मान मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याबरोबरच त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पेठ-सुरगाणा कळवण- बागलाण दिंडोरी इगतपुरी या आदिवासी भागासाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत करण्यात आला व त्यासाठी डॉ. पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती अश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १६) रोजी ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी बालकांच्या कुपोषणाचा आढावा घेण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके २,२२८ व तीव्र गंभीर कुपोषित बालके २८६ आहेत. गेल्या या आर्थिक वर्षात अंगणवाडीतील बालकांना नियमित दिलेला पूरक पोषण आहार तसेच अतिरिक्त आहारामध्ये पोषणकल्पवडी तसेच मायकोन्युट्रन्स दिल्यामुळे मार्च महिन्याच्या तुलनेत जूनअखेर कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे सभापती आहेर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एक मूठ पोषण अभियान प्रभावीपणे राबविल्यानेसुद्धा बालकांच्या वजनात वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात २२८ अंगणवाडी सेविका ८३९ अंगणवाडी मदतनीस व ८५ मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे रिक्त आहेत. माहे डिसेंबर २०१९ अखेर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे त्यानुसार प्रकल्प स्तरावरून अर्ज मागविण्यात आले असून, सदर भरती प्रक्रियामध्ये मुलाखत घेणार नसल्याने पारदर्शी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमिता आढळल्यास संबंधित बालविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या सभेत वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जुनी व मोडकळीस आलेली आहे इमारतीचे निर्लेखनसुद्धा मंजूर झालेले असून, रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याने वडाळीभोई येथे नवीन इमारत लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी सदस्या कविता धाकराव यांनी केली. बैठकीस गणेश अहिर, रेखा पवार, सुनीता सानप, गीतांजली पवार, कमल आहेर, महिला बाल कल्याण अधिकारी दीपक चाटे आदी सहभागी होते.