अपघाताचा बनाव; पतीची हत्त्या : पत्नीसह तिच्या प्रियकराला अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 18:16 IST2017-09-23T18:14:42+5:302017-09-23T18:16:08+5:30
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्यात काहीतरी वस्तूने प्रहार करून खून केला

अपघाताचा बनाव; पतीची हत्त्या : पत्नीसह तिच्या प्रियकराला अखेर अटक
नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या प्रियकर व संशयित पत्नी विरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्यात काहीतरी वस्तूने प्रहार करून खून केला व नंतर मृतदेह दुचाकीवर आणून हॉटेल जत्रा जवळ महामार्गावर टाकून देत अपघाताचा बनाव केला. पोलिसांनी मोबाईल ट्रॅकरच्या मदतीने दोघांचे संभाषणावरून तसेच ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संशयितांनी मयताच्या अंगावर कपडे घालून तसेच पायात बूट घालून तो कचरा फेकण्यासाठी व नंतर तसेच फोनवर बोलत मेडिकल मध्ये गेल्याचा बनाव केला होता.
ज्या दुचाकीवरून मृतदेह नेला त्यावेळी मयताच्या पायात असलेले बूट रस्त्याला घसल्याच्या खुणा पोलिसांना मिळाल्या होत्या .