धामोडे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:29 IST2021-01-21T20:26:37+5:302021-01-22T00:29:20+5:30
येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ९ पैकी पाच जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत.

धामोडे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत
येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ९ पैकी पाच जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत.
गतवेळी धामोडे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी भाऊसाहेब भड, जालिंदर भड, ज्ञानदेव भड यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास पॅनलने तर रामदास गायकवाड, नाना भड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल असा सरळ सामना रंगला होता.
यात परिवर्तन विकास पॅनलचे ताराबाई भड, निवृत्ती भड, कांताबाई भड, रंजना येवले, संदीप मोरे हे पाच तर शेतकरी विकास पॅनलचे रामदास गायकवाड, वैशाली येवले, भाऊसाहेब लाड, साहेबराव कांबळे हे चार उमेदवार विजयी झाले.