बिरोळा सोसायटीत ‘शिवनेरी विकास’ला बहुमत

By Admin | Updated: August 1, 2016 00:27 IST2016-08-01T00:26:56+5:302016-08-01T00:27:09+5:30

बिरोळा सोसायटीत ‘शिवनेरी विकास’ला बहुमत

The majority of Shivneri Vikas in Birola society | बिरोळा सोसायटीत ‘शिवनेरी विकास’ला बहुमत

बिरोळा सोसायटीत ‘शिवनेरी विकास’ला बहुमत

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील बिरोळा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवनेरी शेतकरी विकास गटाने १२ जागा जिंकून विरोधी शेतकरी विकास गटाला मात देत निर्विवाद बहुमत मिळाविल्याने शिवनेरी गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या मार्गदर्शना खाली भरत शेलार यांनी नेतृत्व केलेल्या शिवनेरी गटाच्या विजयाने पुन्हा एकदा कांदे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे . विजयी उमेद्वारांमध्ये कर्ज दार गटातून बाळू नवसारे , भाऊसाहेब पाटिल , भिवराव पाटिल, रामदास वाघ, भरत शेलार , संतोष शेलार , सुकलाल शेलार , सुदाम शेलार , महिला राखीव गटातून लीलाबाई पगार , मीराबाई मोरे , इतर मागास प्रवर्ग महादू बोरसे , अनुसूचित जाती जमती गटातून फकीरा मोरे हे विजयी झाले
आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी डी देशमुख यांनी काम पाहीले, त्यांना राजेंद्र गायकवाड यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: The majority of Shivneri Vikas in Birola society