भाजपाच्या बहुमताने हुकले नगरसेवकांचे पर्यटन
By Admin | Updated: March 2, 2017 02:18 IST2017-03-02T02:17:57+5:302017-03-02T02:18:23+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार आहे.

भाजपाच्या बहुमताने हुकले नगरसेवकांचे पर्यटन
नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार असून, बहुमतामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांचे पर्यटनही हुकले आहे. त्यामुळे यंदा प्रथमच महापौरपदाच्या निवडणुकीत ना भरजरी पैठण्यांची ना भरभक्कम शॉपिंगची चर्चा कानावर पडणार आहे.
महापालिका निवडणुकीत यंदा भाजपाने चमत्कार दाखवत तब्बल ६६ जागा खिशात टाकल्या आणि स्पष्ट बहुमत प्राप्त केले. महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये यंदा कुणाच्याही कुबड्या न घेता भाजपाला एकहाती सत्ता सहजपणे मिळविणे सोपे झाले आहे. महापालिकेत भाजपाने ६६ तर शिवसेनेने ३५ जागा जिंकल्या आहेत. कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे पक्षीय बलाबल आहे.