डांगसौंदाणे परिसरातील शेतमालांचे मोठे नुकसान
By Admin | Updated: May 6, 2014 21:36 IST2014-05-06T18:02:55+5:302014-05-06T21:36:58+5:30
डांगसौंदाणे-परिसरात आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

डांगसौंदाणे परिसरातील शेतमालांचे मोठे नुकसान
डांगसौंदाणे-परिसरात आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सततच्या होणार्या पावसामुळे शेतकरी हवालदील झाला असून उन्हाळ कांदा मिरची, मिरची, टोमॅटो, बाजरीसह डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.१ तास चाललेल्या या पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळी कांदा पूर्णपणे भिजला आहे. तर शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगार्याखाली (घोडी) पाणी गेल्याने हा कांदा ही साठवणूक करणे शेतकर्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे.
आज डांगसौदाणे आठवडे बाजार असल्याने मजूर वर्ग बाजारात असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कांद्यांच्या घोड्यांवर प्लास्टीक कागद (ताडपत्री) झाकण्यासाठी शेतकर्यांना सर्वत्र धावपळ करावी लागली.या पावसामुळे टोमॅटो, मिरची, आदी पिके रोगांना बळी पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे तर काढणी आलेली उन्हाळ बाजरी पुर्णपणे भिजल्याने खराब झाली आहे. तर बहर धरलेल्या डाळींब बागा या पाण्यामुळे बुरशीजन्य आजारांना बळी पडून बागा खराब होण्याची भिती डाळींब उत्पादक शेतकर्यांना वाटू लागली आहे.
गत चार ते पाच दिवसापासून वातावरणात रोजच बदल घडत असतांना आज झालेल्या या पावसाने शेतकर्यांच्या चिंतेत अजुनच वाढ झाली आहे.आठवडे बाजाराच्या निमित्ताने आलेल्या बाजारकरुसह, व्यापारी वर्गाची पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. (वार्ताहर)