शिंदवड परिसरात पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:00 PM2020-10-03T15:00:43+5:302020-10-03T15:02:13+5:30

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Major damage to kharif crops due to rains in Shindwad area | शिंदवड परिसरात पावसाने खरिप पिकांचे मोठे नुकसान

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे नुकसानग्रस्त शेती परिसराची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे.

Next
ठळक मुद्देवरखेडा : पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे १५ दिवसात दोन वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागासह सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खरिपाचे सोयाबीन, भुईमूग आदी काढणीस आलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तर वादळी पावसाने टमाट्याच्या सºया पडल्याने फळे खराब होत आहे. द्राक्ष उत्पादकांना कोरोनामुळे मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असतांना या मुसळधार पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरु झाला असुन घड कमकुवत आहे. त्यावर खर्च ही वाढला असतांना या पावसाने डावणी व घड जिरु नये म्हणुन अधिकचा खर्च वाढला आहे. शिंदवड व परिसरात झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या फरशीचे नुकसान झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न मार्गी लागत नसुन लवकरात लवकर पुलाचे काम करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यावेळी त्यांनी परिसराची पहाणी केल्यानंतर दिले दरम्यान नूकसान झालेल्या निकांचे तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Major damage to kharif crops due to rains in Shindwad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app